अकोला:- शेतकऱ्यांचे नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्यासंबंधीची तक्रार विमा कंपनीकडे केली त्यांना नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे त्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये ११ ऑक्टोंबर रोजी तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिक विमा योजनेत अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यातील काहींना भरपाई मिळाली मात्र कारंजा तहसिल मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना याची भरपाई मिळाली नाही.
त्या तहसीलमधील १७ हजार ९७९ शेतकरी भरपाई मिळण्यापासुन वंचित राहिले, त्यामधीलच काही क्रोधी शेतकऱ्यांनी कार्यालयात जाऊन उत्तर विचारले. त्यांना उत्तर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुर्ची व टेबलची तोडफोड केली.