भंडारा: या जिल्ह्यात धान कापणीच्या तोंडावर पाणी आल्यामुळे तेथील धान पिकाची नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात परंपरागतरीत्या भात शेतीचे पीक घेतले जाते .भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात भात शेतीचे उत्पन्न होते .परंतु गेल्या काही दिवसांपासून तिथे ढगाळ वातावरण असून ,पावसाचे पाणी आल्यामुळे,हाती आलेले धानाचे पीक जमीन दोस्त झाले आहे .
याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच नुकसानीची पाहणी करावी ,व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी ,अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
त्यासोबतच करडी पालोरा परिसरात रविवारी दुपारी ३:३०वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात हलक्या धानाचे कडपा पडलेल्या असून पाण्यामुळे ओलेचिंब झाले आहे.याने धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली . तहसीलदार व महसूल विभागाने मौका पाहणी चौकशी करून आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.