वर्धा :- वर्धेमधील चानकी कोपरा गावात महालक्ष्मी चा कार्यक्रम असल्याने जेवण बनवण्यासाठी आलेल्या महिलेने घरातील लॉकरमधून सोन्याचा गोफ चोरला.या घटनेची नोंद दहेगाव पोलीस ठाण्यात केली आहे.
साधना राजेंद्र ठाकरे यांच्या घरी महालक्ष्मी बसणार असल्याने त्यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता, गावातील महिलाच स्वयंपाक बनवण्यासाठी आल्या होत्या. अचानक लाईन गेल्याने सर्व महिला स्वयंपाक घरातून बाहेर निघाल्या, पण कविता नावाची महिला स्वयंपाक घरातून निघताना दिसली नाही.
तिनेच घरातील कपाटामधुन ६० हजाराच्या गोफ चोरून नेल्याच्या संशयावरून दहेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, या प्रकरणाची पुढील तपास दहेगाव पोलीस करत आहेत.