वाशिम:- तालुक्यामध्ये ग्रामीण भागात जास्त घाण दिसून येते रस्त्याच्या कडेला कचराच कचरा दिसून येते, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते गावामध्ये शौचालय असून सुद्धा ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात असतात त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते.
यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता शासनामार्फत ‘निर्मल भारत’ तसेच ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात येतो. पण पण त्याची गाव तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. रस्त्याजवळ शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येते.
गावातील उघड्यावरील शौचवारी थांबवल्यास रोगराईला आळा बसू शकते, त्यामुळे गावकऱ्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सकाळी ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय करण्याची मागणी होत आहे.