गडचिरोली:या जिल्ह्यातील एका जहाल माओवादी दामपत्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे .यातील मुलगी ही भामरागडची अन मुलगा हा छत्तीसगडचा आहे.यांचे पाऊले भरकटली होती आणि या दोघांनी हिंसक नक्षल चळवळीत सहभाग घेतला होता .
वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगू (२७ छत्तीसगड) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी (२४, भामरागड) असे या माओवादी दाम्पत्याचे नाव आहे. वरुण भामरागड दलममध्ये कमांडर पदावर तर रोशनी याच दलममध्ये सदस्य पदावर होती.
यांची तेव्हा ओळख झाली होती ,आणि नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मग प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला ,मात्र नक्षल चळवळीत व्यवहारिक आयुष्य जगता येत नाही ,त्यामुळे त्यांनी नऊ वर्षानंतर आत्ता शस्त्रे म्यान करून आत्मसमर्पणाची वाट निवडली .
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते ,परंतु आता त्यांनी आत्मसमर्पण केल्याने, त्यांनाच शासन साडेअकरा लाख रुपये देणार आहे.