यवतमाळ:- यवतमाळ मधील कळंब शहरातील सिमेंट व डांबरी रस्त्याचे काम करण्याकरिता कोट्यावधी रुपये खर्च केल्या गेले, पण काम गुणवत्ताधारक न केल्यामुळे सिमेंट रस्ते फुटायला व उखडायला सुरुवात झाली आहे.
विशेषतः हे दोषदायित्व कालावधीमध्ये रस्ते उखडायला सुरुवात झाली, या काळात रस्ते उखडायला असल्याने संबंधित यंत्रणेने कंत्राटदाराकडुन रस्ते दुरुस्त करून घेणे अपेक्षित असते. असे होताना दिसत नाही म्हणून कंत्राटदार व अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे दिसून येते.
रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम उखडल्यानंतर एकही लोकप्रतिनिधी याविषयी बोलत नाही. म्हणून नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे की लोकप्रतिनिधी यात सहभागी तर नाही? तर सामान्य नागरिकांनी मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.