भंडारा: भंडारा बालाघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरून चुल्हाड या गावाला जाणारा,तीन किलोमीटर अंतराच्या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहे.या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत .या मार्गाचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना मिळाले होते.परंतु आश्वासनाचा यंत्रणेला विसर पडला असल्याचा आरोप आहे.कारण या मार्गावरून नागरिकांना खडतर प्रवास करावा लागतो .
चुल्हाड ते सुकळी नकुल या ३ किमी अंतरच्या मार्गाचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांतर्गत करण्यात आले आहे. ५ वर्षे मार्गाचे देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे नमूद करण्यात आले आहे, परंतु काम पूर्ण झाले असता, कंत्राटदाराने पाठ फिरविली आहे. मार्गावर खड्डे पडले आहेत. ही खड्डे पुन्हाहून डांबरीकरण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असताना, खड्डे दुरुस्त करण्यात आले नाही. यामुळे कंत्राटदार नियम धाब्यावर बसवीत असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत.
याच मार्गाचे पाचशे मीटर अंतर पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे, मात्र उर्वरित अडीच किलोमीटर अंतराचा मार्ग खड्ड्यात आहे, त्यामुळे गावकरी संतापले आहेत, व मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.