अकोला:- अकोल्यामधील कामरगाव मध्ये अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात बाप आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 14 ऑक्टोंबर च्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
सुनील माहुरे वडिलांचे व आचल सुनील माहुरे हे मुलीचे नाव होते, हे कामरगाव येथील रहिवासी होते.मिळालेल्या माहितीनुसार, आचल माहुरे ही तिच्या लहान बहिणीला वस्तीगृहात सोडायला गेली व सुनील माहुरे दुसऱ्या कामानिमित्त गेले.
परततांना दोघेही बापलेक सोबत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तेथील ग्रामस्थांनी त्वरित त्यांना रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.