वर्धा :- वर्धेमधील कारंजा येथे १४ ऑक्टोंबर रोजी कुऱ्हाड न दिल्याने व्यक्तीला मारहाण करून जखमी केले, मनोज कोवे हा राहाटी येथे आपले कुऱ्हाड दुसऱ्याला दिली होती ते कुऱ्हाड घेण्याकरिता गेला.
त्यावेळी त्या व्यक्तीने कुऱ्हाड दुसऱ्याला दिली होती म्हणून मनोज ला सांगितले तु नंतर ये मनोज आणखी संध्याकाळी गेला, तेव्हा त्याला गब्बर उईके व विशाल म्हणतात तुझी कुऱ्हाड येथे नाही.
असे म्हणत शिवीगाळ केली त्याने शिवीगाळ करण्यास मनाई केली तर शोभा उईके विशाल उईके व बादल ढोके यांनी मनोज कोवे लाथा बुक्क्यांनी व काठीने मारून जखमी केले. या प्रकरणाची तक्रार मनोज ने कारंजा पोलिसात केली व पुढील तपास सुरू आहे.