वाशिम:- ग्रामीण भागामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात पेरत असतात. पावसामुळे शेतीचे काम मंदावत होते, आता पाऊस थांबला व सोयाबीन सोंगणी सर्व शेतकऱ्यांचे एकावेळेस आल्याने वाशिम मध्ये शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही.मजूर एकरी सोयाबीन ३ हजार ५०० रू दर घेत असतात.
सोयाबीन सोंगणीच्या दर जास्त असल्यामुळे मजूर शेतात जाण्यापूर्वी किंमत ठरवून जात असतात, ज्या शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही ते परजिल्हातील मजुराकडून काम करून घेतात. बहुतांश ठिकाणी मजुरांची कमतरता असल्याने बाहेरील मजूर आणल्या जाते.