बुलढाणा :- बीबी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू आहे. बीबी मध्ये अनेक घरकुलासाठी रेती मिळत नाही लाभार्थी गिट्टी व खदानीवरील डस्ट चा वापर करून घरकाम करत आहेत,
काही लाभार्थ्याचे घर रेतीअभावी अर्धवट राहिले आहेत. सिंदखेडराजा मधुन बीबी परिसरातील रेती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेतीमाफिया सर्रास रेतीची अवैध वाहतूक करीत असतात,
यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. या अंधारात होणाऱ्या वाहतुकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे महसूल विभागाने या अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.