चंद्रपूर :या जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात देवी विसर्जनापासून युवकांच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता .याच वादातून एका टोळीने दोन युवकांवर तलवारीने हल्ला केला. आशिष गुप्ता असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .तर उदय यादव याला जबर मार लागला आहे.
बल्लारपुरातील गोरक्षण वार्डात दुर्गादेवी विसर्जनापासून युवकांच्या दोन टोळीमध्ये वाद झाला होता.यात युवकांच्या टोळीने आशिष च्या छातीवर तलवारीने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला.व उदयच्या डोक्याला जबर मार लागला.
त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .गेल्या काही दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरात युवकांच्या टोळीत वाद झाला होता ,त्यामुळे पोलिसांनी काही ठिकाणी छापे मारून तलवारी जप्त केल्या होत्या .
त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले होते.मात्र हे वाद संपण्याची चिन्हे काही दिसत नाही आहे. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे .आता या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहे.