अकोला :- शहरामध्ये भाजी,फळे, किराणा असे अनेक वापरासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर सर्रास सुरू आहे, महानगरपालिका अशा वापरकर्त्यावर कार्यवाही करते तरीदेखील प्लास्टिक कॅरीबॅग उत्पादक करणारे चोरून पिशव्या उत्पादित करत असतात .
व वस्तू विक्रेत्यांना उपलब्ध करून देत असतात महानगरपालिका व नगरपालिका विभागाकडून रस्त्या लगतच्या भाजीविक्रेतेवर दंड बसवितात तरी देखील नागरिक त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही असा आरोप होत आहे.
शहरांमध्ये बाजारपेठ, सार्वजनिक जागा,मुख्य रस्ते या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे ढीग साचल्याचे दिसून येते.त्या पिशव्या नाले , गटर मध्ये गेल्यानंतर सांडपाणी अडकते. व दूषित वातावरण निर्माण होते यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते प्रशासनाने प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या उत्पादकावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.