वाशिम :- यावर्षी खरीप हंगामातली मुख्य पिके सोयाबीन वर सततच्या पावसामध्ये सोयाबीनच्या दरात घट झाली. बाजारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडले.खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरली जाते
यावेळेसही शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली पण सतत पाऊस पडल्याने काही भागांमध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. या पावसामुळे शेगांची वाढ खुंटली व शेंगा बरोबर भरल्या नाही यामुळे शेतकऱ्यांच्या लागलेला खर्च निघाला नाही.
सोयाबीनला साधारणता ४००० ते ४५०० रुपये पर्यंत भाव मिळत आहे एकरात एका शेतकऱ्यांचे १८ ते २० हजार खर्च होत आहे, त्या तुलनेत अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.