अमरावती :- अमरावतीमध्ये ८ ऑक्टोंबर रोजी आधार कार्ड अपडेट केल्यानंतर एका ३५ वर्षीय व्यक्तीची ४ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकारणी वैभव प्रशांत बदनोरे यांनी १८ ऑक्टोंबर रोजी मोबाईलवरून ऑनलाइन फसवणूक केल्याच्या गुन्हा दाखल केला,
वैभव सांगतात की जियो केअर कडून कॉल आला व समोरून म्हणाले तुमचे सिम तयार झाले. तुमच्या मोबाईल अँड्रॉइड आहे सिम रद्द करण्यासाठी हा नंबर डायल करा. बदनोरे यांनी नंबर डायल करताच सिम बंद होऊन आधारकार्ड लॉक झाले असा मॅसेज आला, व १० ऑक्टोंबर ला त्यांच्या एसबीआय खात्यामधून व बँक ऑफ महाराष्ट्र मधून ऑनलाईन रक्कम काढल्याचे समजले.
दोन्ही खाते मिळून १ लाख ९९ हजार ७४० रुपये काढले गेले, वैभव बदनोरे यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, पोलिसांनी अज्ञात ऑनलाइन युजरविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली.