अकोला :- अकोला मधील दोन युवक सिनेमांमध्ये जसे बंदूक घेऊन शूट करतात त्याचप्रकारे हे दोन तरुण हातामध्ये नकली बंदुक घेऊन रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करायचे,पोलिसांना ही कृत्य दिसताच त्यांनी बंदूक असली आहे की नकली हे बघण्यासाठी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले.तपासणीनंतर बंदूक नकली असल्याचे कळले.
या प्रकरणी दोन्ही युवकावर कारवाही करण्यात आली त्यातील एका युवकाचे नाव बंटी भोसले (१९) व दुसऱ्याचे अरमान चव्हाण (२०) आहे. ते पिक्चर मधील प्रसिद्ध डायलॉग , हाणामारीचे रील्स तयार करायचे याचे वेड तेथील सर्व शाळकरी मुलांना लागले होते. यातील काही रिल्स गुन्हेगारी वाढवण्यात मदत करतात असे पोलीस निरीक्षकाच्या निदर्शनास आले,
पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी प्रसिद्धीच्या नादात रील्स तयार केल्या असे सांगून विनवणी करू लागले व भविष्यात अशा रिल्स बनविणार नाही याचे ग्वाही दिली, अशा रील्स सोशल मीडियावर न टाकण्याचे आवाहन पोलिसांनी दिले आहे.