यवतमाळ :- वाढत्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .आणि अधुनमधून सोयाबीन कापण्याच्या हंगामात पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, जर शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत नुकसानीची नोंद केली तेव्हाच त्यांच्या शेताचे सर्वेक्षण करण्यात येईल असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पिक विम्यामध्ये कापूस, तूर, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन असे पीक येतात. नुकसान झाल्याच्या ७२ तासातच पिक विमा विभागाकडे तक्रार करावी किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी जमा झाले त्याची सुद्धा नोंद पीक विमा कंपनीत करावी, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक १४४४७ या क्रमांकावर तक्रार दाखल करावी.