वाशिम:- २० ऑक्टोंबरला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेतीच्या वादातून पती-पत्नीच्या अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न केला, मिळालेल्या माहितीनुसार वाशिम मधील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे नवनाथ मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोरे व मोहन घुगे यांचे शेत जवळजवळ आहे.
नवनाथ मोरे यांच्या आई – वडील शेतात जात असताना मोहन घुगे यांनी रस्त्यात दोघेही दांपत्यांना अडवले व शेतातील रस्त्यातून जाऊ नका असा वाद घातला,वाद जास्त झाल्याने मोहन घुगे याने मोरे यांच्या आई वडिलांना मारहाण केली. त्यामुळे दोघेही दांपत्याने पोलीस स्टेशनला गेले असता त्यांच्या अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे त्यांनी पूर्ण कुटुंबाची तक्रार नोंदविली आहे.