यवतमाळ :- रविवारला ११ वाजता यवतमाळ शहरातील आर्वी मार्गावरील बार मध्ये दोन व्यक्तीचा वाद झाला मिळालेल्या माहितीनुसार, गणेश राठोड, ऋषभ काटोडे, परमेश्वर व वैभव हे दारू पिण्यासाठी बारमध्ये बसले होते. त्यांच्या समोरच्या टेबलवर आरोपी उत्कर्ष जयस्वाल, आकाश कुबडे व ऋषिकेश खाडे हे सुद्धा दारू पीत होते.
त्यांनी अचानक गोंधळ घातला परमेश्वर हा समजावण्यासाठी गेला असल्याने उत्कर्षने त्याला शिवीगाळ करून गालावर चापट मारली यामुळे परमेश्वर याने दारूची बॉटल त्याला मारली. गोंधळ वाढत होता म्हणून बार व्यवस्थापकाने त्या तिघांना बाहेर काढले, पण ते तिघेही बदला घेण्यासाठी बाहेर थांबून राहिले व ११ वाजता चौघेजण बाहेर पडले तेव्हा उत्कर्षने परमेश्वरच्या छातीत, पोटात व डोक्यात चाकूने वार केले.
वैभव परमेश्वरला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर सुद्धा चाकूने वार करण्यात आला नागरिकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले असता परमेश्वरला जास्त मार असल्याने त्याचा मृत्यू झाला व वैभव गंभीर जखमी आहे, गणेश राठोड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली याप्रकरणी पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.