अकोला :- २१ ऑक्टोबरला गडचिरोली व छत्तीसगड रस्त्यावर झालेल्या चकमकित दोन जहाल नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला, गडचिरोली हे नक्षलवाद्यांचे गड आहे तेथील पाच नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यातील दोन ठार झाले.मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक गडचिरोली – नारायणपूर हद्दीत झाली या चकमकीमध्ये सी-६० चे जवान व नक्षलवादी जया उर्फ भुरी पादा (३१) वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी उर्फ दसरू तुलावी(६५) अशा दोन जहाल नक्षलवादी चा समावेश होता.
त्यातील ३ नक्षलवादी पडून गेले देवे उर्फ रिता (२५) व बसंत आणि सुखमती यांच्या शासनाने ३८ लाखाचे बक्षीस ठेवले होते, या चकमकीत सापडलेल्या सावजी तुलावी नक्षलवादी कमांडरवर हत्या व जाळपोड संबंधी २२६ गुन्हे दाखल होते यामध्ये हत्या ५४ चकमकी ८४ जाळपोळ ३८व ५० इतर गुन्हे आहेत, गेल्या ४० वर्षापासून सावजी नक्षलवादी कमांडर हा सक्रिय आहे याच्यावर १६ लाखाचे बक्षीस होते यावर्षी अशा चकमकीत २४ नक्षलवादी ठार झाले आहेत.